अधिकाऱ्यांना भष्ट्राचाराचा भस्म्या झालाय - Marathi News 24taas.com

अधिकाऱ्यांना भष्ट्राचाराचा भस्म्या झालाय

www.24taas.com, भोपाळ
 
मध्यप्रदेशात बेहिशोबी मालमत्ता जमवणाऱ्या आणखी एका भ्रष्ट अधिकाऱ्याचं पितळ उघडं पडलं आहे. भोपाळच्या आरोग्य संचालकाकडून थोडीथोडकी नव्हे तर चक्क १०० कोटींची संपत्ती असल्याचं आढळून आलं आहे.
 
ए. एन. मित्तल असं या महाभागाचं नाव आहे. लोकायुक्तांनी मारलेल्या छाप्यात मित्तल याच्याकडे ८ घरं, १५ गाड्या, कोट्यवधींची जमीन आणि दागिने आढळून आले.
 
शिवाय त्याच्या पत्नीच्या नावावर गॅस एजन्सीही आहे. तसंच या भ्रष्ट आरोग्य संचालकासोबत काम करणाऱ्या ज्युनियर अधिकाऱ्याकडे १० कोटींची संपत्ती आढळली आहे.
 
 
 
 

First Published: Thursday, May 10, 2012, 14:42


comments powered by Disqus