Last Updated: Friday, May 11, 2012, 13:09
www.24taas.com, नवी दिल्ली कर्नाटकातल्या अवैध खाणकाम घोटाळा प्रकरणात सुप्रीम कोर्टानं माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांना चांगदाच दणका दिलाय. ओबलापुरम खाणकाम घोटाळ्यासंदर्भातील सुनावणी दरम्यान कोर्टानं सीबीआयला येडियुरप्पांविरोधात तपासाचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सीबीआयला तपासाचे मार्ग आता मोकळे झाले आहेत.
अहवाल सादर करण्यासाठी सीबीआयला ३ ऑगस्टपर्यंत मुदत मिळाली आहे. ‘एम्पावर्ड कमिटी’ने येडियुरप्पा यांच्याविरुद्ध सीबीआय कारवाईची मागणी केली होती. अवैध खाणकाम घोटाळ्याप्रकरणी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आपल्याच परिवारातील सदस्यांना चुकीच्या मार्गाने लाभ देण्याचा आरोप येडियुरप्पांवर आहे. तसचं त्यांच्या परिवाराशी संबंधित एका ट्रस्टच्या कारभाराच्या पडताळणीची मागणीही यावेळी सुप्रीम कोर्टानं मान्य केलीय. त्यामुळे येडियुरप्पा चांगलेच गोत्यात येण्याची शक्यता आहे.
First Published: Friday, May 11, 2012, 13:09