ठाकरे कुटुंबाची महाराष्ट्रात घुसखोरी - लालूप्रसाद, Thackerays in Maharashtra`s Guskhori

ठाकरे कुटुंबाची महाराष्ट्रात घुसखोरी - लालूप्रसाद

ठाकरे कुटुंबाची महाराष्ट्रात घुसखोरी - लालूप्रसाद
www.24taas.com,पाटणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आज टिकेची झोड उठवली. ठाकरे कुटुंबानेच घुसखोरी केली आहे. मात्र, शिवसेनेन त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले आहे.

ठाकरे कुटुंबीय मूळचे बिहारचे असून त्यांनी तत्काळ महाराष्ट्रातून बाहेर पडावे, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे. ठाकरे कुटुंबीयाने महाराष्ट्रात घुसघोरी केली आहे. मुंबई देशाची आहे. येथील जनतेची ठाकरे दिशाभूल करीत आहे, असा आरोप लालूयादव यांनी केला.

बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार आणि कॉंग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनाही ठाकरे कुटुंबीयांच्या बिहारींविरोधातील वक्तव्यावर प्रखर टीका केली होती. त्यानंतर लालूनी टीका केली. ठाकरे कुटुंबीय मूळचे बिहारी आहेत. त्यांचे पूर्वज बिहारमध्ये वास्तव्यास होते. या कुटुंबीयांनी महाराष्ट्रात घुसखोरी केली आहे.

या टीकेनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अधिक भाष्य केले नाही. लालूंच्या टीकेला महत्व देण्याचे कारण नाही, राऊत म्हणाले.


First Published: Sunday, September 9, 2012, 14:55


comments powered by Disqus