नरेंद्र मोदींनी मानले ब्रिटनचे आभार!, Thankful to British MPs for their invites - Modi

नरेंद्र मोदींनी मानले ब्रिटनचे आभार!

नरेंद्र मोदींनी मानले ब्रिटनचे आभार!
www.24taas.com , झी मीडिया,अहमदाबाद

नरेंद्र मोदी यांना लंडनभेटीचे आमंत्रण मिळाले आहे. ब्रिटनमधील दोन प्रमुख राजकीय पक्षांनी मोदींना लंडनभेटीचे निमंत्रण दिले आहे. याबद्दल मोदांनी ट्विट करताना म्हटलं आहे, मला आनंद आहे. ज्या खासदारांनी प्रयत्न केले त्यांचा मी आभारी आहे.

ब्रिटनमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या लेबर पार्टीतील भारतीय मित्र संघटनेचे अध्यक्ष आणि संसद सदस्य बॅरी गार्डिनर यांनी नरेंद्र मोदी यांना ब्रिटन भेटीचे पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी मोदींना ‘लंडन भेटीवर या’ असे निमंत्रणही दिले आहे.


‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये ‘द फ्युचर ऑफ मॉडर्न इंडिया’वर (आधुनिक भारताचा भविष्यकाळ) संबोधित करण्यासाठी या, अशीही विनंती या पत्रात मोदींना करण्यात आली आहे. आठवडाभरापूर्वीच मोदींना हे निमंत्रण मिळाले आहे. नरेंद्र मोदी यांच्याशी लेबर पार्टीच्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधींचा गेल्या अनेक वर्षांपासून संपर्क आहे. नरेंद्र मोदी हे दिग्गज राजकीय नेते आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, अशी माहिती ब्रेंट नॉर्थमधील लेबर पक्षाच्या खासदार गार्डिनर यांनी दिली.

मोदी यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. त्यांच्याशी संवाद साधणे, हे ब्रिटनच्या हिताचेच आहे, असे मला वाटते. २००९ मध्ये मी त्यांना भेटलो होतो, त्या भेटीचा आनंद मला आजही आठवतो. मोदी यांची ब्रिटनभेट प्रलंबित आहे, असे लेबर पक्षाचे खासदार स्टीफन पाऊंड म्हणाले. गुजरातमधील २००२च्या दंगलींनंतर अमेरिकेप्रमाणे ब्रिटन सरकारनेही मोदींपासून चारहात लाबं राहिले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, August 14, 2013, 12:13


comments powered by Disqus