आधी प्रेम...लग्नाचं आमिषानंतर देह विक्री!, The beloved son - father raped me, then began to prostitution

आधी प्रेम...लग्नाचं आमिषानंतर देह विक्री!

आधी प्रेम...लग्नाचं आमिषानंतर देह विक्री!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

राजधानीमध्ये नागालॅंडमधील एका तरूणीवर मुलगा आणि वडिलांनी बलात्कार केला. त्यानंतर तिला देह विक्री करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक बात पुढे आली आहे. मात्र, त्याआधी प्रेमाच्या राळ्यात ओढून तिला लग्नाचं आमिष दाखविले गेले होते.

२० वर्षीय तरूणी नागालॅंडमधून शिकण्यासाठी नवी दिल्लीत आली. तिने राहण्यासाठी एक भाड्याची खोली घेतली. तिथे ती राहू लागली. कालांतराने तिची ओळख घर मालकाच्या मुलाशी झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर ती त्याच्या जाळ्यात ओढली गेली. दोघांने प्रेम फुलत गेले. त्यांने तिला लग्नाचे आमिष दाखविले. मात्र, लग्न केले नाही. आपण काहीतरी कमवू त्यानंतर लग्न करू असे आश्वासन तो तिला देऊ लागला.

लग्नाचा विषय काढताच तो तिला टाळू लागला. एके दिवशी प्रियकर असलेल्या मुलाने आणि त्याच्या वडिलांनी बलात्कार केला. ते एवढ्यावच न थांबता तिला देह विक्री करण्यास भाग पाडले. तिला चंदीगड आणि नवी दिल्लीत काही ग्राहकांकडे पाठविले. माज्ञ, १५ मे रोजी तिने एका ग्राहकाच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि तिने थेट पोलीस ठाणे गाठले. तिने दिलेल्या तक्रारीवरून सहा जणांना पोलिसांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करण्यात आले आहे.


प्रेमी मुलासह त्याचे वडील आणि दोन दलालांना पोलिसांनी अटक केली. नागालॅंडची ही तरूणी दिल्लीत आपल्या मित्रासोबत आली होती. जहांगिरपुरी येथ ती हामिद व्यक्तीच्या घरी भाड्यांने राहत होती. यावेळी हामिद याचा मुलगा शालू याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झालेत. तिने लग्नाचा हट्ट केल्यानंतर काही काम मिळाल्यानंतर लग्न करू असे शालू यांने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. याच दरम्यान, त्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.

तरूणीच्या तक्रारीनंतर हामिद, शालू, राकेश, निशांत यांच्यासह बलात्कार करणारा राजकुमार याला अटक करण्यात आली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 23, 2013, 15:29


comments powered by Disqus