मतदारांनी नाकारलं तरी उमेदवाराचाच विजय होणार!, The Right to Reject All: Indian democracy’s new hot button

मतदारांनी नाकारलं तरी उमेदवाराचाच विजय होणार!

मतदारांनी नाकारलं तरी उमेदवाराचाच विजय होणार!
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली

निवडणुकीच्या सर्व उमेदवारांना नाकारण्याचा अधिकार मतदारांना असल्याचं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टानं नोंदवले आहे. मात्र, या निर्णयाने उमेदवाराला चपराक बसणार नाही. मतदारांनी नाकारलं तरी त्यांतून जास्त मतं मिळवलेला उमेदवारच विजयी ठरणार आहे.

मतदारांना राईट टू रिकॉलचा अधिकार असला पाहिजे. तसा तो त्याला दिला पाहिजे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने राईट टू रिकॉलचा निर्णय दिला आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण निकालात व्होटिंग मशिनमध्ये `नन ऑफ द अबाऊव्ह` हे बटन ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. या निकालामुळे स्वच्छ उमेदवार देण्याचं नैतिक बंधन राजकीय पक्षांवर येईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.

पिपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या स्वयंसेवी संस्थेनं याबाबत याचिका केली होती. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे व्होटिंग मशिनवर ‘नन ऑफ द अबाऊव्ह’ हे बटण येणार आहे. असं असलं तरी ज्या उमेदवारांना मतं मिळाली आहेत, त्यांतून जास्त मतं मिळवलेला उमेदवारच विजयी ठरणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, September 27, 2013, 15:55


comments powered by Disqus