तिसऱ्या आघाडीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थितThird Front meeting in Delhi, NCP present

तिसऱ्या आघाडीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित

तिसऱ्या आघाडीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली

नवी दिल्लीमध्ये तिसऱ्या आघाडीसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. नवी दिल्लीत आज एकाच मंचावर समाजवादी पक्ष, जेडीयू, सीपीआयएम, जेडीएस, सीपीआय यांसह २० पक्ष उपस्थित आहेत. जेडीयूचे शरद यादव, सीपीएमचे प्रकाश करात, समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव एकत्र दिसून आले.

धर्मांध शक्तींपासून देशाचा बचाव हेच आजच्या बैठकीचं उद्दिष्ट्य आहे, असं वक्तव्य सीताराम येचुरींनी केलंय. तर देशात सध्या देश तो़डण्याचं कारस्थान रचलं जातंय. त्याविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज नितीश कुमारांनी व्यक्त केलीय. विशेष म्हणजे या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचीही हजेरी होती. त्यामुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.

मात्र ही बैठक धर्मांध शक्तींविरोधातील असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस याठिकाणी उपस्थित असल्याचं राष्ट्रवादीचे नेते डी.पी.त्रिपाठी यांनी म्हटलंय. त्यामुळं कुणीही राष्ट्रवादीच्या उपस्थितीबाबत वेगळा अर्थ काढू नये असंही त्यांनी म्हटलंय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 30, 2013, 15:21


comments powered by Disqus