गॅसदरवाढीवर थॉमस यांची स्लॅब सिस्टमची सूचना Thomas`s letter on Gas price hike

गॅसदरवाढीवर थॉमस यांची स्लॅब सिस्टमची सूचना

गॅसदरवाढीवर थॉमस यांची स्लॅब सिस्टमची सूचना
www.24taas.com, नवी दिल्ली

सबसिडीच्या दरात सहा सिलिंडर देण्याच्या निर्णयाला आता काँग्रेसमधूनच विरोध होऊ लागलाय. केंद्रीय अन्न मंत्री के. व्ही. थॉमस यांनी सिलिंडरच्या संख्येबाबत पंतप्रधानांना पत्र लिहलंय. यात गॅसच्या भाववाढीसाठी ‘स्लॅब सिस्टम’ वापरण्याची कल्पना थॉमस यांनी सुचवली आहे.

या पत्रात सातव्या सिलिंडरला सरसरकट बाजारभाव लावण्याऐवजी सिलिंडरच्या संख्येवरुन किंमतस्तर ठरवण्याची मागणी केलीये. तसचं 24 व्या सिलिंडरनंतर बाजारभाव लावण्याची मागणी केलीये. पेट्रोलियममंत्री जयपाल रेड्डी आणि चिदंबरम यांनी सिलिंडरच्या निर्णयावरुन माघार घेणार नाही अशी भूमिका मांडली असताना काँग्रेसमधीलच मंत्री या निर्णयाला विरोध करुन लागलेत.

थॉमस यांनी गॅसदरवाढ मागं घेण्याची केलेली मागणी म्हणजे निव्वळ धुळफेक असल्याची टीका भाजपनं केलीये. सरकारच्या निर्णयाला विरोध असला तर मंत्रिपदाचे राजीनामे द्या असंही भाजपनं म्हटलंय.

First Published: Tuesday, September 18, 2012, 12:58


comments powered by Disqus