Last Updated: Thursday, May 8, 2014, 16:54
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीनवी दिल्लीत चोख सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या मंदिर मार्ग भागात दोन जणांनी 30 वर्षाच्या महिलेवर बलात्कार केलाय. पोलिसांनी या प्रकरणी बृजमोहन आणि गोलू नावाच्या इसमाला अटक केली आहे. तर तिसरा आरोपी मात्र अद्याप फरार आहे.
पश्चिम दिल्लीच्या बलजीत नगर भागात राहणारी महिला आपल्या नातेवाईकासोबत वैद्यकीय तपासणीसाठी आरएमएल हॉस्पिटलमध्ये गेली होती, ही महिला रिज रोडने पायीच घरी जात होती.
या वेळी तीन जणांनी या महिला आणि तिच्या नातेवाईकांना धमकी दिली. दोन जण या महिलेला खेचून झाडांकडे घेऊन गेले आणि बलात्कार केला. यानंतर या दोन्ही जणांची लूट देखिल केली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 8, 2014, 16:54