Last Updated: Monday, March 10, 2014, 17:34
www.24taas.com, झी मीडियाआम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी चुकून ३ जिवंत आरटीआय कार्यकर्त्यांना श्रद्धांजली दिली आहे. या मुद्यावरून सोशल मीडियावर विरोधकांनी केजरीवाल यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
केजरीवाल यांनी शनिवारी अहमदाबादमध्ये रॅलीच्या दरम्यान भाषण करताना, चार माहिती अधिकार कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र पीटीआयच्या माहितीनुसार यातील तीन कार्यकर्ते आजही जिवंत आहेत.
ज्या चार कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहिली यात, अमित जेठवा, भानू देवानी, जयसुख भमभानिया आणि मनिष गोस्वामी या चौघांना समावेश आहे. पण यातील फक्त अमित जेठवा यांचा मृत्यू झाला आहे. अन्य तीनही जण जिवंत असल्याचा दावा पीटीआयचा आहे.
केजरीवाल यांनी जिवंत कार्यकर्त्यांना श्रद्धाजंली वाहिली, या चुकीवर विरोधकांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 10, 2014, 14:22