तीन दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठाही जप्त, three terrorist arrest in Delhi

तीन दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठाही जप्त

तीन दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठाही जप्त
www.24taas.com, नवी दिल्ली

दिल्लीत तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीये. हे तिघे जण इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या या संशयित दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आलाय.

पोलीस या दहशतवाद्यांची कसून चौकशी करत आहे. मात्र या दहशतवाद्यांकडून सापडलेल्या शस्त्रसाठ्यामुळं त्यांचा देशात मोठ्या दहशतवादी कारवाईचा कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. या दहशतवाद्यांचा ऑगस्टमध्ये झालेल्या पुणे बॉम्बस्फोटाशीही संबंध असल्याची शक्यता आहे.

तसंच यापूर्वी दिल्लीत झालेल्या दहशतवादी कारवायांशी यांचा संबंध आहे का याचीची कसून चौकशी करण्यात येत आहे. हे दहशतवादी दिल्लीत नेमके कधी आणि कसे शिरले होते याबाबतही तपास करण्यात येत आहे.

First Published: Thursday, October 11, 2012, 12:29


comments powered by Disqus