बलात्काराचा बदला घेण्यासाठी गँगरेपTo avenge Of rape 4 peoples gang rape on Her

बलात्काराचा बदला घेण्यासाठी गँगरेप

बलात्काराचा बदला घेण्यासाठी गँगरेप
www.24taas.com, झी मीडिया, बाराबंकी, उत्तर प्रदेश

उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये चार तरुणांनी एका विवाहित महिलेसोबत गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडलीय. इथल्या हैदरगढ परिसरात हा गुन्हा घडला. इथल्या एका गावात आदिवासी आळीत बदला घेण्यासाठी एका विवाहित महिलेचं अपहरण करून चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेत एक महिला आणि तिचा नवराही सहभागी होता.

पीडित महिलेचा दोष केवळ इतका होता की तिच्या नवऱ्यावर गँगरेपमध्ये सहभागी असलेल्या महिलेच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. पीडितेचा नवरा याप्रकरणी तुरुगांत शिक्षा भोगतोय. महिलेवर अत्याचार केल्यानंतर त्या नराधम चौघांनी तिला रस्त्याच्या कडेला फेकलं आणि फरार झाले.

रविवारी सकाळी ग्रामस्थानं तिला ग्रामिण रुग्णालयात भर्ती केलं. पीडित महिलेची प्रकृती गंभीर असून पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेतलीय. ३० वर्षीय पीडितेचं शनिवारी संध्याकाळी अपहरण करण्यात आलं होतं. असंद्रा पोलीस स्टेशन क्षेत्रातील गावाजवळ नेवून पीडितेवर गँगरेप केला गेला आणि तशाच गंभीर परिस्थितीत तिला रस्त्यावर फेकून दिलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 14, 2014, 16:13


comments powered by Disqus