Last Updated: Thursday, October 3, 2013, 23:49
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीनरेंद्र मोदींचा `पहले शौचालय, फिर देवालय` मंत्र विश्व हिंदू परिषदेच्या पचनी पडलेला नाही. हा हिंदुत्वाचा अपमान आहे. देवालय आणि शौचालय यांची तुलना करता येणार नाही, असं तोगडियांनी मोदींना खडसावलंय. मोदींच्या विरोधात तोगडियांनी आपला त्रिशूल उगारल्यानं संघ परिवारातच मतभेद असल्याचं चित्र निर्माण झालंय...
प्रखर हिंदुत्वासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काहीसा वेगळा सूर लावलाय. दिल्लीमध्ये तरुणांशी संवाद साधताना `पहले शौचालय, फिर देवालय` असं सांगत राम मंदिरापेक्षा विकासाला आपलं प्राधान्य असल्याचं मोदींनी सूचित केलंय.
मोदींच्या या विधानावर आता संघ परिवारातून प्रतिक्रिया यायला सुरूवात झालीये. ज्येष्ठ भाजप स्वयंसेवक मा. गो. वैद्य यांनी देवालय आणि शौचालय हे दोन्ही वेगळे आणि तितकेच महत्त्वाचे विषय असल्याचं म्हटलंय. तर भाजप नेते विनय कटियार यांनी मोदींच्या विधानात काहीही चूकीचं नसल्याचं म्हटलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, October 3, 2013, 23:49