जाहिरातींना आवरा... १२ मिनिटांत संपवा!, Trai notifies 12-minute per hour advertising rule for TV channels

जाहिरातींना आवरा... १२ मिनिटांत संपवा!

जाहिरातींना आवरा... १२ मिनिटांत संपवा!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

तुमच्या आवडीचा एखादा सिनेमा किंवा कार्यक्रम किंवा मॅच सुरू आहे... समोरचा प्रोग्राम रंगात आलाय आणि अचानक... टीव्हीस्क्रीनवर जाहिराती सुरू होतात... तुमचा प्रचंड हिरमोड होतो... आणि त्या रटाळ जाहिराती पुढच्या बराच वेळेपर्यंत सुरूच राहतात... होय ना! पण, हे आता कायमचं बंद होणार आहे.

होय, कारण हा टीव्ही चॅनल्सवरचा जाहिरातींचा मारा थांबवण्याचा निर्णय भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायनं घेतलाय. यासाठी लवकरच ट्रायकडून नवीन नियमावलीही जाहीर करण्यात येणार आहे. या नव्या निवयमावलीनुसार सर्व टीव्ही चॅनेल्सना एका तासात केवळ बारा मिनिटंच जाहिराती दाखवता येतील. ऑक्टोबर २०१३ पासून ही नियमावली लागू होणार आहे.

सध्या अनेक चॅनेलवर तासाला २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ जाहिराती दिसतात. पण, ट्रायचे नियम लागू झाल्यावर प्रत्येक टीव्ही चॅनेलवर एका तासात जास्तीत जास्त बारा मिनिटे जाहिराती दिसतील. यातील दहा मिनिटे जाहिराती (कमर्शियल अॅड) आणि दोन मिनिटे चॅनेलच्याच कार्यक्रमांच्या जाहिराती (प्रमोशनल अॅड/प्रोमो) दिसतील.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 29, 2013, 17:51


comments powered by Disqus