Last Updated: Thursday, August 15, 2013, 11:52
www.24taas.com, झी मीडिया, लखनऊआयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांना निलंबित केल्यानंतर उत्तरप्रदेश सरकारचं पुढचं टार्गेट ठरलेत ते दुर्गा शक्तीचे पती अभिषेक सिंह...
दुर्गा शक्ती नागपाल यांचे पती आयएएस अभिषेक सिंह यांची बदली केल्याचं बुधवारी राज्य सरकारनं जाहीर केलंय. बुधवारी एका प्रेस नोटच्या साहाय्यानं राज्य सरकारनं पत्रकारांना अभिषेक सिंह यांच्या बदलीच्या निर्णयाविषयी माहिती दिलीय. अभिषेक सिंह यांना झाशीच्या ‘जॉईंट मॅजिस्ट्रेट’ येथे नियुक्त करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी अभिषेक सिंह हे गाजियाबाद येथे होते. अभिषेक सिंह यांच्यासह २०११ च्या बॅचच्या अन्य १५ आयएएस आधिकाऱ्यांचीदेखील बदली केल्याचं अखिलेश सरकारनं म्हटलंय.
महत्त्वाचं म्हणजे, अभिषेक सिंह आणि यांच्यासोबत असणाऱ्या १५ आधिकाऱ्यांचे प्रशिक्षण २२ ऑगस्टला पूर्ण होणार आहे. पण हे प्रशिक्षण पूर्ण होण्याआधीच त्याच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, August 15, 2013, 11:52