Last Updated: Wednesday, January 2, 2013, 18:14
www.24taas.com, कोलकातातृणमूल काँग्रेसच्या स्थापना दिवस कार्यक्रमात अश्लील डान्स करत गोंधळ घालणा-या कार्यकर्त्याविरोधात कारवाई करण्यात आलीय. या कार्यकर्त्याला तृणमूल पक्षातून निलंबित करण्यात आलंय.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात नेत्यांनी जोरदार हंगामा केला. स्टेजवर अश्लिल नृत्य सुरु असताना कार्यकर्त्यांनी नृत्यांगनांवर पैसे उधळले.
कोलकताजवळच्या भांगोर गावात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तृणमूल काँग्रेसचा 15 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला होता.
First Published: Wednesday, January 2, 2013, 17:58