ट्रक अपघातात २१ ठार, तीन बालकांचा समावेश, Truck accident in Belgaum, 21 died

ट्रक अपघातात २१ ठार, तीन बालकांचा समावेश

ट्रक अपघातात २१ ठार, तीन बालकांचा समावेश
www.24taas.com, वृत्तसंस्था, बेळगाव

गुलबर्गामधून कोकणात सावंतवाडीकडे येणारा ट्रक बेळगाव-बागलकोट मार्गावर पलटल्याने २१ जणांचा मृत्यू झाला. ट्रकमध्ये कामगारांचा समावेश होता. मृतांतमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. हलकीजवळ आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला.

कर्नाटकातील गुलबर्गा येथे मजूरी काम करणारे ट्रकमधून प्रवास करत असलेले ३५ मजूरांपैकी २१ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झालेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सौंदत्ती तालुक्यातील हलकी गावात ट्रकने प्रवेश केल्यानंतर हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.


 
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 16, 2013, 11:32


comments powered by Disqus