स्कूलबसला ट्रकची धडक; १२ चिमुकले ठार!, Twelve school children dead in bus-truck collision

स्कूलबसला ट्रकची धडक; १२ चिमुकले ठार!

स्कूलबसला ट्रकची धडक; १२ चिमुकले ठार!
www.24taas.com, जालंधर

स्कूल बस आणि ट्रकमध्ये झालेल्या धडकेमध्ये १२ लहानग्यांना आपला जीव गमवावा लागलाय. पंजाबच्या जालंधर शहरातल्या नकोदर क्षेत्रानजीकच्या जहीर गावात सोमवारी सकाळी ही घटना घडलीय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आणखी काही लहान मुलं जखमी असल्याचं समजतंय. बस आणि ट्रकमध्ये झालेल्या या अपघातात स्कूल बसच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झालाय.

पोलीस अधिक्षक राजेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सात विद्यार्थ्यांचा हॉस्पीटलमध्ये हलवण्यापूर्वीच घटनास्थळी मृत्यू झाला. तर पाच विद्यार्थ्यांनी हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय.

ही स्कूल बस नकोदरच्या दिशेनं जात होती. जखमींना नकोदर आणि जालंधरच्या हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलंय.

First Published: Monday, March 4, 2013, 11:09


comments powered by Disqus