Last Updated: Sunday, May 12, 2013, 13:05
www.24taas.com, झी मीडिया,बंगळुरूबंगळुरू येथील भाजप कार्यालयाच्या बाहेर १७ एप्रिल रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी दोघा संशयीतांना पोलिसांनी पकडले. कोईंबतूर येथून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
सुल्फीकार अली (२२) आणि शाबीर (२४) या दोघांना कुन्नामकुलम जिल्ह्यातील जवळील केचेरी येथील शाबीर याच्या नातेवाईकांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या पोलिसांनी ही कारवाई केली. अली आणि शाबीर यांच्या मोबाईल फोनच्या संकेतानुसार दोघांचा ठावठिकाणा समजला, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे बंगळुरू स्फोटातील माहिती उघड होण्यास मदत होईल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, May 12, 2013, 13:05