`आप`च्या मंत्री राखी बिर्ला यांच्या गाडीवर हल्ला, unknown person attacked on rakhi birla car

`आप`च्या मंत्री राखी बिर्ला यांच्या गाडीवर हल्ला

`आप`च्या मंत्री राखी बिर्ला यांच्या गाडीवर हल्ला
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

नवी दिल्लीत `आप`च्या महिला आणि बालविकास मंत्री राखी बिर्ला यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला आहे.

मंगोलपुरी भागात राखी बिर्ला यांच्या गाडीवर हा हल्ला झाला आहे.

हल्लात अज्ञातांनी राखी बिर्ला यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. हल्लाचं कारण अजून समजू शकलेलं नाही.

राखी बिर्ला या दिल्लीच्या सरकारमधील सर्वात कमी वयाच्या मंत्री आहेत. राखी बिर्ला या सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे.

आपच्या मंत्र्यांनी कोणतीही सुरक्षा घेणार नसल्याचं यापूर्वीच जाहीर केलं आहे. यामुळे आपच्या मंत्र्यांना सुरक्षा घ्यावी लागणार की काय?, असा प्रश्न उपस्थित होणार आहे.

राखी बिर्ला या राजकारणात येण्याआधी पत्रकार होत्या, त्यांचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. राखी बिर्ला यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आम आदमी पक्षाकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, January 5, 2014, 20:06


comments powered by Disqus