राज्यसभेचाही कौल एफडीआयचा बाजूनं, UPA govt wins FDI vote in Rajya Sabha

राज्यसभेचाही कौल एफडीआयचा बाजूनं

राज्यसभेचाही कौल एफडीआयचा बाजूनं
www.24taas.com, नवी दिल्ली

मल्टीब्रँड रिटेल सेक्टमरमध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीवर आज राज्यसभेत मतदान झालं. राज्यसभेचा कौल एफडीआयच्या बाजूनंच लागला आणि लोकसभेप्रमाणंच इथंही सरकारचंच पारडं जड असल्याचं चित्र दिसून आलं.

राज्यसभेतही विरोधकांचा प्रस्ताव फेटाळला गेलाय. राज्यसभेत एकुण २१२ सदस्य उपस्थित होते. त्यापैकी सरकारच्या बाजुनं १२३ सदस्यांनी मत दिलं तर सरकारच्या विरोधात १०९ मतं पडली. बहुजन समाज पार्टीनं एफडीआयच्या बाजूनं मत दिलं तर समाजवादी पार्टीनं मतदानाच्या अगोदरच सभात्याग केला.

सपा आणि बसपानं घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यसभेतील एफडीआयच्या परीक्षेचा निकाल अगोदरच लागला होता. मतदानानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालंय.

First Published: Friday, December 7, 2012, 15:46


comments powered by Disqus