Last Updated: Saturday, August 25, 2012, 17:12
www.24taas.com, नवी दिल्लीकोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी भाजपनं केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. कोळसा वाटपात शुन्य तोटा झाल्याचा सरकारनं केलेला दावा हास्यास्पद असल्याचं भाजप नेते अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ज्या दिवशी सरकारनं कोळसा खाणींचं वाटप केलं त्या दिवशीच सरकार तोट्यात गेलं असा दावा जेटलींनी केलाय.
कोळशाच्याक साठ्याचे वाटप करताना कोणत्यानही प्रकारचा गैरव्य वहार झाला नसून देशाचं काहीही नुकसान झालेलं नाही, असा दावा अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला होता. कोळसा बाहेर काढलेलाच नाही, त्याामुळे नुकसान झालेलंच नाही, असं स्पाष्टीीकरणही चिदंबरम आणि कोळसामंत्री श्रीप्रकाश जयस्वालल यांनी दिलं होतं.
हा दावा आज अरूण जेटली यांनी खोडून काढला. कोळसा खाण वाटपातून खासगी कंपन्यांना अब्जावधी रुपयांचा फायदा झाला. त्यामुळं कोळसा काढलाच नाही तर नुकसान कसं झालं हा सरकारचा दावा दिशाभूल करणारा आहे असंही त्यांनी सांगितलं. टू जी स्पेक्ट्रम वाटपातही देशाचं नुकसान झालं. त्यावेळी सिब्बल यांनी जसे दावे केले तशी चूक चिदंबरम करीत असल्याचा टोलाही त्य़ांनी लगावला.
First Published: Saturday, August 25, 2012, 17:09