Last Updated: Friday, March 15, 2013, 14:37
www.24taas.com, नवी दिल्ली यूपीएसीच्या अभ्यासक्रमात झालेल्या बदलाला केंद्र सरकारनं स्थगिती दिली आहे. यूपीएसीच्या अभ्यासक्रमातून मराठी भाषेसह प्रादेशिक भाषांची हकालपट्टी केली होती. या निर्णयाला अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला होता. शिवसेना आणि नरेंद्र मोदींनीही या निर्णयाला विरोध केला होता. हा विरोध लक्षात घेऊन केंद्रानं अभ्यासक्रमातल्या बदलांना स्थगिती दिली गेलीय.
यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचे पेपर मराठी भाषेतून लिहिता येणार नाहीत, सर्व पेपर इंग्रजी किंवा हिंदीतूनच लिहावे लागतील, असे फर्मान केंद्रीय लोकसवा आयोगानं काही दिवसांपूर्वी काढलं होतं. मात्र, त्यानंतर झालेल्या विरोधामुळे आयोगाला आपला निर्णय बदलणं भाग पडलंय. देशभर प्रादेशिक पक्षांनी केलेल्या आंदोलनानंतर मराठीसह प्रादेशिक भाषा वगळण्याचा निर्णय स्थगित करण्यात आलाय. या निर्णयाची घोषणा शुक्रवारी लोकसभेत करण्यात आली. यामुळे यूपीएससीच्या परीक्षा मराठीतूनही देता येणार आहे.
गेल्या आठवड्यत केलेल्या बदलांमुळे यंदा या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे चांगलेच वांदे झाले होते. हा धोका लक्षात घेऊन शिवसेना, मनसेसह देशभरातील प्रादेशिक पक्षांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. अखेर हा निर्णय स्थगित आलाय.
First Published: Friday, March 15, 2013, 14:37