टीव्हीवरील आत्महत्येची नक्कल करताना मुलाचा मृत्यू, uttar pradesh ten year old dies while copying tv serial suicide

टीव्हीवरील आत्महत्येची नक्कल करताना मुलाचा मृत्यू

टीव्हीवरील आत्महत्येची नक्कल करताना मुलाचा मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया, सोनभद्र
टीव्हीवर आत्महत्येचे दृश्य पाहून नक्कल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहा वर्षाच्या मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहे. कुटुंबियांना दिलेल्या माहितीनुसार तेजस याने एक दिवसापूर्वी आत्महत्येचे दृश्य टीव्हीवर पाहिले होते.

गुरूवारी दुपारी खिडकीला बेल्ट लटकावून आत्महत्येचा सीनची नक्कल करत होता. त्याची मान बेल्टने आवळली गेली. शेजारी खेळत असलेल्या भावाचे लक्ष याकडे गेल्यावर तेजसला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तेजसला मृत घोषित केले.

उत्तर प्रदेशातील अनपरा येथे ही घटना घडली. दीपक भारद्वाज यांचा मुलगा तेजस सेंट फ्रांसिस स्कूलमध्ये पाचवी इयत्तेत शिकत होता. घटनेच्या वेळी तेजस आपल्या भावासह एका खोलीत खेळत होता. भाऊ व्हिडिओ गेम खेळण्यात मग्न होता. तर तेजस शेजारी खेळत होता. भावाने अचानक तेजसकडे पाहिले तर त्याला बेल्टचा फास लागला होता. त्याची जीभ बाहेर आली होती आणि मानेला ब्लेटचा फास लागला होता.

सुरूवातीला भावाला वाटले की तेजस मस्करी करत आहे. पण त्याला एक दोन आवाज दिल्यानंतर कोणतीही हालचाल झाली नाही म्हणून तो जवळ गेला. तेव्हा त्याला हा प्रकार लक्षात आला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 24, 2013, 15:40


comments powered by Disqus