शालेय अभ्यासक्रमात नेहरूंचे निधन स्वातंत्र्यापूर्वीच , Uttar pradesh text book fault

शालेय अभ्यासक्रमात नेहरूंचे निधन स्वातंत्र्यापूर्वीच

शालेय अभ्यासक्रमात नेहरूंचे निधन स्वातंत्र्यापूर्वीच

www.24taas.com , झी मीडिया, उत्तर प्रदेश

भारतात शालेय पाठ्य़पुस्तकांचा दर्जा घसरण्याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षण
पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात चुका आहेत. ऊर्दू विद्यार्थ्यांच्या शालेय पाठ्य पुस्तकात चुकीची माहिती दिलेली आहे.

आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वितरीत करण्यात आलेल्या पुस्तकात ह्या चुका करण्यात आलेल्या आहे. शैक्षणिक वर्ष २०१३ -१४ साठी असलेले पाठ्यपुस्तक जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील शाळेत शिकवण्यात येत आहे.

भारताचे पंतप्रधान होण्यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरूंचे निधन झाल्याचा उल्लेख या पुस्तकांमध्ये आहे.

इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या `हमारी जुबान` या पुस्तकात पान क्रमांक ३३ वर नेहरूंची `इंदिरांना लिहलेली पत्र` या धड्याला चक्क रामायण-महाभारताचे शीर्षक देण्यात आले आहे. याहून कहर म्हणजे नेहरूंचे निधन स्वातंत्र्यापूर्वी १९४६ला झाल्याचा उल्लेख आहे.

नेहरूंचे निधन २७ मे १९६४ ला झाले होते. १९४७ ते १९६४ इतका प्रदीर्घ काळ नेहरू भारताचे प्रधानमंत्री होते. याचा विसर उत्तर प्रदेशातील पाठ्यपुस्तक निर्मिती करणा-यांना पडला आहे.

स्थानिक सरकारच्या अखत्यारित असलेल्या उत्तर प्रदेशातील शिक्षण पाठ्यपुस्तक मंडळाने चुका करण्याचा विक्रम केला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ चालवला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याची कुठलीही चिंता उत्तर प्रदेश
सरकारला नाही, असं मत भाजपच्या उत्तरप्रदेशातील प्रवक्ते डॉ. चंद्रमोहन यांनी व्यक्त केलयं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 4, 2014, 20:25


comments powered by Disqus