उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणांचा राजीनामा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणांचा राजीनामा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणांचा राजीनामा
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी राजीनामा दिलाय.  गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. त्यांना काँग्रेस पक्षातूनही मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत होता.

उत्तराखंडमधील पूर परिस्थीती हताळण्यातही त्यांना अपयश आलं होतं. अखेर आज त्यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झालंय.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याची चर्चा आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री हरीश रावत हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 1, 2014, 00:13


comments powered by Disqus