सोनिया गांधींचे जावई वडेरांना क्लीनचीट,Vadra gets clean chit for land deals, Khemka says not aware

सोनिया गांधींचे जावई वडेरांना क्लीनचीट

सोनिया गांधींचे जावई वडेरांना क्लीनचीट
www.24taas.com,नवी दिल्ली

काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई राबर्ट वडेरा यांना हरियाणाच्या अधिका-यांनी दिलासा दिलाय. जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी हरियाणातल्या उपायुक्तांनी वडेरा यांना क्लीनचीट दिली आहे.

या 12 उपायुक्तांनी याबाबत चौकशी केल्यानंतर ही क्लीनचीट दिली आहे. गुडगाव, फरिदाबाद, पलवल आणि मेवात इथल्या जमीन खरेदीत गैरव्यवहार झाला नसल्याचं स्पष्टीकरण या उपायुक्तांनी दिलंय. त्यामुळं विरोधकांचं लक्ष्य ठरलेल्या वडेरा यांना दिलासा मिळालाय.

काँग्रेस अध्यक्ष आणि यूपीएच्या चेअरमन सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा आणि रिअल इस्टेट कंपनी डीएलएफ यांच्यात ५८ करोड रुपयांचा जमीन व्यवहार झाले होते. या व्यवहारांत घोळ असल्याचा आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी केला होता.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा काँग्रेस-भाजपवर हल्लाबोल केलाय. काँग्रेस आणि भाजपचं साटंलोटं असल्याची टीका केजरीवालांनी केलीयं. रॉबर्ट वडेरांविरूद्ध भाजप काही बोलणार नाही, तर गडकरींविरोधात काँग्रेस काही बोलणार नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी असल्याचं केजरीवाल म्हणालेत.

First Published: Friday, October 26, 2012, 18:06


comments powered by Disqus