फेसबुकवरच्या ‘विचित्र योगी’च्या पोलीस शोधात, vichitra yogi in deepak bhardwaj

फेसबुकवरच्या ‘विचित्र योगी’च्या पोलीस शोधात

फेसबुकवरच्या ‘विचित्र योगी’च्या पोलीस शोधात
www.24taas.com , मुंबई

बसपाचे अरबपती नेते दीपक भारद्वाज यांच्या हत्याप्रकरणात आणखी एक खुलासा झालाय. या प्रकरणात स्वामी प्रतिमानंद यांचं नाव पुढे येत असून पोलीस स्वामींच्या शोधात आहेत. आत्तापर्यंत झालेल्या चौकशीत ही हत्या मालमत्तेसंबंधातील वादावरून झाल्याचं समजतंय.

दीपक यांची त्यांच्या दिल्ली फार्म हाऊसवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणाला एक नवं वळण मिळालंय. या प्रकरणात स्वामी प्रतिमानंदांचा हात असल्याचं उघडकीस आलंय. त्यांच्यावर या हत्येची सुपारी दिल्याचा संशय आहे. दीपक भारद्वाज आणि स्वामींमध्ये संपत्तीवरून वाद होते. आश्चर्याची गोष्ट, म्हणजे हे स्वामी फेसबुकवर ‘विचित्र योगी’ या नावाने परिचित असून अनेक परदेशी महिलांचाही त्यांच्या भक्तांत समावेश आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत शूटर पुरूषोत्तम राणाला याला अटक केलीय. तर दुसऱ्या आरोपीने पतियाला कोर्टात आत्मसमर्पण केलंय. मात्र, या प्रकरणातील प्रमुख आरोपी अजूनही फरार आहे. पोलीस हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये या‘विचित्र’ स्वामींचा शोध घेत आहेत.

First Published: Friday, April 5, 2013, 16:56


comments powered by Disqus