तडफडून तडफडून सैनिकांनं प्राण सोडला; व्हिडिओ प्रसारित, video of naxlist attack of 2010 in chattisgarh

तडफडून-तडफडून सैनिकांनं प्राण सोडला; व्हिडिओ प्रसारित

तडफडून-तडफडून सैनिकांनं प्राण सोडला; व्हिडिओ प्रसारित
www.24taas.com, नवी दिल्ली

नक्षलवादी किती क्रूर कारस्थानं करू शकतात, हे पुन्हा एकदा जगासमोर आलंय. २०१० साली छत्तीसगडच्या ताडमेटला जंगलात नक्षलवाद्यांनी जवानांना घेरून त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात ७६ जवान शहिद झाले होते. महत्त्वाचं म्हणजे या हल्ल्याचं नक्षलवाद्यांनी व्हिडिओ शूटींगही केलं होतं आणि तब्बल तीन वर्षानंतर आता हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय. यामध्ये एका जिवंत हाती सापडलेल्या जवानाची क्रूर पद्धतीनं करण्यात आलेल्या हत्येचंही चित्रण करण्यात आलंय.

६ एप्रिल २०१० रोजी नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला होता. एका मोहिमेवरुन परतणाऱ्या सीआरपीएफच्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी योजना आखून हल्ला केला होता. हल्ला कसा झाला, हल्या्धत नंतर जवानांकडील शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा कसा लुटण्यांत आला तसेच घनदाट जंगलामध्येो नक्षलवाद्यांवर कशा पद्धतीने उपचार करण्यापत आले इत्यादी सर्व गोष्टीटचा व्हिडिओ बनविण्याटत आला. या हल्ल्याकनंतर एका जवानाची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यारत आली होती. त्याटचे डोके फोडून शिर धडावेगळं करण्या त आलं तसंच हात-पायदेखील तोडण्यातत आले. डोळेही बाहेर काढण्यात आले आणि तडफडून तडफडून या जवानानं तिथंच प्राण सोडला. हा सगळा प्रसंग यात चित्रीत झालाय.

ही सगळी दृश्यं जाणून बुजून चित्रीत करण्यात आली होती. जंगलातील आदिवासी आणि गावकऱ्यांना धाकात ठेवण्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आल्याचं, गुप्तचर सूत्रांचं म्हणणं आहे.

First Published: Wednesday, April 3, 2013, 13:47


comments powered by Disqus