`दानशूर` विजय माल्ल्याचं वाढदिवस सेलिब्रेशन!, Vijay Mallya donates 3 kg gold at tirupati

'गरिब' विजय माल्ल्याचा दानशूरपणा!

'गरिब' विजय माल्ल्याचा दानशूरपणा!
www.24taas.com, हैदराबाद

यूनायटेड ब्रेवरिज ग्रुपचा अध्यक्ष विजय माल्ल्या यांनी आज स्वत:च्या वाढदिसवसानिमित्त तिरुपती बालाजीला तब्बल ३ किलो सोनं दान केलंय.

माल्ल्या यांचा आज ५७ वा वाढदिवस... यानिमित्तानं त्यांनी तिरुपती मंदिराच्या दरवाजाला सोन्याचा मुलामा देण्यासाठी तब्बल ३ किलो सोनं दान केलंय. मंदिराकडून दानाची रितसर पावती घ्यायलाही ते विसरलेले नाहीत.
सोशल वेबसाईटवर हितचिंतकांचे आभारही त्यांनी मानलेत. ‘तुमच्या शुभेच्छांबद्दल मी मनापासून आभारी आहे. मी सध्या तिरुपतीला आहे. बालाजी सगळ्यांचं भलं करो’ असं माल्ल्या यांनी यावेळी म्हटलंय.

डुबत्या किंशफिशरमुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून विजय माल्ल्या सतत चर्चेत राहिलेत. प्रबळ आर्थिक मदतीशिवाय किंगफिशर आणि त्याचे कर्मचारी हेलकावे खातायत. त्याच माल्ल्यांनी दान केलेलं तब्बल ३ किलो सोनं चर्चेचा विषय ठरतंय.

First Published: Tuesday, December 18, 2012, 15:35


comments powered by Disqus