24taas.com-vilasrao deshamukh`s demise

विलासराव देशमुख यांचे निधन

विलासराव देशमुख यांचे निधन
www.24taas.com, चेन्नई

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांचे आज दुपारी १.२४ मिनिटांनी निधन झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना चेन्नईतील ग्लोबल रुणालयात दाखल करण्यात आले होते.

विलासरावांच्या दोन्ही मूत्रपिंड (किडनी) आणि यकृत (लिव्हर) निकामी झाले होते. त्यातच त्यांना लिव्हरमध्ये कॅन्सर (हॅपेटोसेल्युलर कार्सिनोमा) झाला होता. त्यामुळे त्यांना ग्लोबल रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

प्रकृतीत सुधारणा होत नाही तोवर त्यांच्यावर लिव्हर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करता येणार नाही, असे ग्लोबल हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे स्पष्ट केले होते. दोन दिवसांपूर्वी प्रकृतीत सुधारणा झाली होती. ते उपचारांना प्रतिसादही देत होते. मध्येच त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत होता. आज त्यांचे निधन झाले.

First Published: Tuesday, August 14, 2012, 15:39


comments powered by Disqus