Last Updated: Wednesday, August 28, 2013, 17:30
www.24taas.com, झी मीडिया, इटानगरअरुणाचल प्रदेशातील एक खळबळजनक घटनेचा पर्दाफाश झाला आहे. अरुणाचल प्रदेशातील पश्चिमी सियांग जिल्ह्यातील लीकाबाईमधील प्रायव्हेट शाळेत एका हॉस्टेल वॉर्डनने तब्बल १४ अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
साधारण ४ ते १३ वयोगटातील मुलींवर गेल्या काही दिवसांत शाळेतल्याच शिपायांनी विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याची घटना घडली. काही मुलींनी पालकांजवळ तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ही गोष्ट कळल्यावर गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी पालकांनी पोलिस ठाण्याबाहेर आंदेलन केलं. या शाळेत गेल्या ३ वर्षांपासून लैंगिक अत्याचारांच्या घटना घडत आहेत. बलात्कारानंतर बाहेर कुणाला याबद्दल बोलल्यास मारून टाकण्याच्या धमक्याही देत.
या प्रकरणी विपीन वासवान याला अटक करण्यात आलं आहे. तसंच शाळेचे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांची चौकशी सुरू हे. या घटनेचा अरुणाचल प्रदेशमध्ये तीव्र निषेध होत असून गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, म्हणून अनेक सामाजिक संघटना आंदोलन करत आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, August 28, 2013, 17:30