आश्रमशाळेत शिक्षकानेच केला ११ मुलींवर बलात्कार, Watchman, teacher arrested in Chhattisgarh for rapin

आश्रमशाळेत शिक्षकानेच केला ११ मुलींवर बलात्कार

आश्रमशाळेत शिक्षकानेच केला ११ मुलींवर बलात्कार

www.24taas.com, रायपूर
संपूर्ण देशाला हदरविणाऱ्या दिल्ली गँगरेप प्रकरणाला काही दिवस झाले असताना आता छत्तीसगडमध्ये असा काहीसा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील झलियामारी गावात असलेल्या एका आश्रमशाळेतील ११ मुलींवर बलात्कार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आश्रमशाळेतील आठ ते बारा वर्षांच्या मुलींवर बऱ्याच काळापासून लैंगिक अत्याचार करणाऱ्याच्या आरोपात एका शिक्षकाला आणि चौकदाराला पोलिसांनी अटक केले आहे
.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आश्रमशाळेच्या अधीक्षक महिलेला तात्काळ निलंबित केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या बऱ्याच दिवसांपासून शाळेतील ११ विद्यार्थ्यींनीवर शिक्षक असलेले मन्नूराम गोटा आणि चौकीदार दीनानाथ लैंगिक अत्याचार करीत होते. भीतीमुळे या मुलींनी ही गोष्ट कोणाला सांगितली नाही.

परंतु, गेल्या शुक्रवारी या प्रकरणाची तक्रार महिला आणि बाल कल्याण विकास अधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील एक पथक आश्रमशाळेत पाठवले.

First Published: Monday, January 7, 2013, 20:01


comments powered by Disqus