देशाच्या पंतप्रधानांचा अपमान सहन केला जाणार नाही- मोदी We will not tolerate our PM`s insult- Modi

देशाच्या पंतप्रधानांचा अपमान सहन केला जाणार नाही- मोदी

देशाच्या पंतप्रधानांचा अपमान सहन केला जाणार नाही- मोदी
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

पंतप्रधानांना देहाती खेडूत म्हणत नवाज शरीफ यांनी देशाचा अपमान केलाय. देशाचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही, असं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी नवाझ शरीफ यांना खडसावलंय.

देशाच्या पंतप्रधानांचा एवढा मोठा अपमान परदेशात केला जातोय, याचं मुख्य कारण म्हणजे काँग्रेसचे नेताच असल्याचं मोदी म्हणाले. काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी पंतप्रधानांचा अपमान केलाय. काँग्रेसचे नेता पंतप्रधानांना नॉनसेन्स म्हणतात, तर मग इतर लोक का नाही बोलणार, असा सवालही मोदींनी उपस्थित केला.

दिल्लीत झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी यूपीए सरकार तसंच दिल्ली सरकारवर जोरदार टीका केलीय. नवाज शरीफ-पंतप्रधान भेटीवर देशाला संशय आहे. या भेटीत पंतप्रधान काय बोलणार हा प्रश्न आहे?

पंतप्रधानांनी ओबामांच्या समोर देशाच्या गरिबीचं मार्केटिंग केलं, असा आरोपही त्यांनी केला. शीला दीक्षित या देशातल्या सर्वात सुखी मुख्यमंत्री आहेत. कॉमनवेल्थ घोटाळ्यानं देशाचा पैसाच नाही तर अब्रूही लुटली, असंही मोदी म्हणाले.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, September 29, 2013, 14:34


comments powered by Disqus