नववर्षाचे स्वागत महागाईने, २०१३ महागाईचं वर्ष, Welcome the new year by costliness

नववर्षाचे स्वागत महागाईने, २०१३ महागाईचं वर्ष

नववर्षाचे स्वागत महागाईने, २०१३ महागाईचं वर्ष
www.24taas.com,नवी दिल्ली

नववर्षाचे स्वागत महागाईने झाले आहे. पेट्रोल ७९ पैशांनी तर डिझेल ५१ पैशांनी महागले आहे. उपनगरीय लोकलच्या तिकीट आणि पासदरातही वाढ करण्यात आलीय. त्यामुळे सामान्यांना सरकारने दिलेला हा दणका आहे.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जनतेला महागाईची भेट मिळालीय. नवी वर्षाचा महागाईचा झटका बसलाय. पेट्रोल आणि डिझेल महागलंय.तर दुसरीकडे मुंबईतल्या उपनगरीय लोकलचा प्रवासही महागलाय. तिकीटाचे दर आणि लोकलचा मासिक पास महागलाय.त्यामुळं गेली वर्षभर महागाईच्या झळा सोसणा-या सामान्यांना नवीन वर्षातही दिलासा मिळाला नाही.


नविन वर्षात जनतेचा सर्व प्रकारचा प्रवास महागणार आहे. मुंबईत लोकलची भाडेवाढ करण्यात आलीय. तर दुसरीकडं पेट्रोल आणि डिझेलच्याही दरात वाढ झाल्यानं सामान्यांच्या खिशाला आणखीनच कात्री लागलीय. प्रवास सुखकर व्हावा यासाठी कार खरेदी करणा-या ग्राहकांनांही जादाचे पैसे मोजावे लागणार आहेत.

पाच हजार पासून तब्बल दोन लाखांपर्यंत कारचे दर वाढले आहेत. त्यामुळं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका जनतेला बसलाय. त्यामुळं २०१३ महागाईचं वर्ष असणार का असा अंदाज वर्तवला जातोय.

First Published: Tuesday, January 1, 2013, 16:11


comments powered by Disqus