बजेट २०१४ : चिदंबरम यांचा बजेट १२ ते १८ पानांच्या आत? What to expect from Finance Minister P Chidamb

बजेट २०१४ : बजेट १२ ते १८ पानांच्या आत?

बजेट २०१४ :  बजेट १२ ते १८ पानांच्या आत?
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

अर्थमंत्री पी चिदंबरम आज लोकसभा निवडणुकीच्या आधीचा आणि यूपीए २ च्या कारकीर्दीतला शेवटचा म्हणजेच अंतरिम बजेट आज सादर करणार आहेत. चिदंबरम हे १२ ते १८ पानांच्या आत बजेट सादर करतील, असं म्हटलं जातंय.

या बजेटकडे सर्वांची नजर लागून आहे, कारण विरोधकांकडून बजेटवर टीका होऊ नये, म्हणून सरकारला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.

शेवटच्या बजेटमध्ये तशी ठोस अशी कोणतीही मोठी घोषणा होत नाही. मात्र सामान्य माणसाला यापासून काही मदत होईल का?, अशी अपेक्षा असते, तसेच ज्या क्षेत्रांना मदतीची अपेक्षा आहे, अशा लोकांचीही बजेटकडे नजर असते.

चिदंबरम यांचं भाषण १२ ते १८ पानांच्या आत असू शकतं, कारण चिदंबरम यांनी म्हटलंय की, जसवंत सिंह जेव्हा २००४ मध्ये अर्थमंत्री होते, तेव्हा त्यांनी अंतरिम, म्हणजेच निवडणुकीपूर्वीचा आणि शेवटचा बजेट सादर केला, तेव्हा त्यांचं भाषण १२ पानांचं होतं.

यानंतर २००९ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी बजेट सादर केला, तेव्हा ते भाषण १८ पानांचं होतं. तेव्हा १२ ते १८ पानांच्या आत बजेटचं भाषण निवडण्याचा पर्याय माझ्यासमोर आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, February 17, 2014, 09:39


comments powered by Disqus