नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान झाल्यावर राहणार कुठे? where will prime minister narendra modi live

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर राहणार कुठे?

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर राहणार कुठे?
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 7 रेसकोर्सवर राहणार आहेत. तसेच मोदींचं नवीन कार्यालय हे दिल्लीतील रायसीना हिल्स येथील साऊथ ब्लॉकमध्ये रुम नंबर 151 हे असणार आहे.

पंतप्रधानांचे निवासस्थान 12 एकर भुखंडावर आहे. निवासस्थानात 5 बंगले आहेत. या बंगल्यांमध्ये पंतप्रधानांचे निवासस्थान, कार्यालय, गेस्ट हाऊस आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एसपीजे कार्यालय आहे. तसेच एक सुंदर सभागृह आहे.

भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दर महिन्याला 1 लाख 60 हजार रूपये इतका पगार असेल. ही माहिती एका माहिती अधिकाराच्या अर्जाच्या उत्तरात देण्यात आली होती. या माहितनुसार पंतप्रधान यांना 50 हजार पगार असेल, खाण्यापिण्याच्या खर्चासाठी 3 हजार रूपये, दैनंदिन खर्चासाठी 62 हजार रूपये आणि 45 हजार मतदारसंघातील खर्चासाठी मिळतील.

नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना हायटेक सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शासकीय निवासस्थान, खासगी कर्मचारी आणि स्पेशल विमानासह अनेक सुविधा भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणार आहे.

7, रेसकोर्स रोड ला तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात, 1984 मध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा दर्जा देण्यात आला. येथे 1984 ते 2014 पर्यंत आठ पंतप्रधान कुटुंबासह राहिले आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 18, 2014, 17:01


comments powered by Disqus