रेल्वे वाय-फायने राहा हाय-फाय..., wi-fi sevice in train

रेल्वे वाय-फायने राहा हाय-फाय...

रेल्वे वाय-फायने राहा हाय-फाय...
www.24taas.com ,नवी दिल्ली

आजपासून रेल्वतर्फे लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये 'ऑन बोर्ड वाय-फाय' सुविधा सुरू करण्यात येत आहे. या सुविधेची सुरूवात दिल्ली-कोलकता राजधानी एक्सप्रेसमधून करण्यात आली आहे. मंगळवारी रेल्वेमंत्री पवनकुमार बंसल यांच्या हस्ते या सुविधेचं उद्घाटन करण्यात आलं. या वाय-फायची सुविधा 'टेक्नो सेट कॉम' कंपनीच्या सहयोगाने सुरू करण्यात आहे.

रेल्वेमध्ये इंटरनेट सुविधेचा वापर करणाऱ्या प्रावाशांना आपला पीएनआर आणि मोबाईल नंबर नोंदवावा लागेल.त्यानंतर त्यांना एक पासवर्ड दिला जाईल. त्याद्वारे या सुविधेचा वापर केला जाऊ शकतो. सध्या ही सुविधा मोफत असेल.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेवेचा सर्वाधिक उपयोग बिझनेस क्लास आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. प्रवाशांच्या गरजा पाहता यावर भरपूर दिवसांपासून विचार केला जात होता. परंतु इतर काही कारणांमुळे हे विचार अंमलात आणले जात नव्हते. पण आता ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. सध्या ही सुविधा कोलकाताला जाणाऱ्या आणि कोलकाताहून येणाऱ्या एक्सप्रेसमध्ये सुरूवात करण्यात आली आहे.

First Published: Tuesday, April 2, 2013, 14:56


comments powered by Disqus