Last Updated: Tuesday, January 22, 2013, 16:28
www.24taas.com, चुहडीवालामहिलांवरील अत्याचारांच्या घटना वारंवार समोर येत असताना महिलांकडून पुरूषांवर होणाऱ्या अत्याचारांच्याही घटना पुढे आल्या आहेत. पंजाबमध्ये एका पत्नीने आपल्या नवऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह आंगणात पुरला आणि त्यावर पुढे तीन महिने ती तंदूर भाजत होती.
मार्च २०१२मध्ये पंजाबमधील चुहडीवाला गावात गांधीराम याची पत्नी मीनू आणि तिचा प्रियकर राकेश यांनी विषप्रयोग करून हत्या केली. त्यानंतर आंगणामध्येच खड्डा खोदून त्यात गांधीरामचा मृतदेह पुरला. यानंतर त्यावर तंदूर भट्टी बांधून पुढे तीन महिने पत्नी त्यावर तंदूर भाजत होती.
अकरा महिन्यांनंतर हे प्रकरण उघडकीस आल्यावर पोलिसांनी मीनू आणि राकेश यांना राजस्थानातून अटक केलं.
First Published: Tuesday, January 22, 2013, 16:28