Last Updated: Sunday, December 8, 2013, 19:09
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात. तरीही चार राज्यांमधील निकाल म्हणजे आमच्यासाठी जनतेने दिलेल्या सूचनाच आहेत. पराभवामुळे निराश नक्कीच आहोत; पण हा निकाल आम्ही स्वीकारत आहोत, अशा शब्दात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पराभव स्वीकारला आहे.
दरम्यान, पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, हा निर्णय पक्षाने घ्यायचा आहे, असे सांगून सोनिया यांनी राहुल गांधींच्या नेतृत्त्वाविषयीच्या प्रश्नालकडे सफशेल दुर्लक्ष केले. या निकालांचे काँग्रेस पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.
यावेळी राहुल गांधीही उपस्थित होते. ते म्हणाले, मतदारांनी या निकालातून आम्हाला एक संदेश दिला आहे. `आम आदमी पक्षा`ने प्रस्थापित राजकारणापेक्षा वेगळी वाट निवडली. सर्वसामान्यांनाही राजकारणामध्ये सहभागी करून घेण्याची `आप`ची कार्यपद्धती कौतुकास्पद आहे. यातून आम्ही नक्कीच धडा घेऊ आणि हे काम त्यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने करू, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, December 8, 2013, 19:09