अटक केल्यास अन्न-पाणी सोडील- आसाराम बापू Will give up food and water if I am arrested: Asaram Bapu

अटक केल्यास अन्न-पाणी सोडील- आसाराम बापू

अटक केल्यास अन्न-पाणी सोडील- आसाराम बापू
www.24taas.com , झी मीडिया, इंदोर

माझ्यासोबत दबरदस्ती केली गेली तर, अन्न-पाण्याचा त्याग करील, अशी धमकी आसाराम बापूंनी दिलीय. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले आसाराम बापू सध्या अटकेच्या गर्तेत अडकलेत.

“माझ्या विरोधात कट रचला गेलाय. जर असं काही झालं तर भक्तगण काय करतील हे सांगता येत नाही”, अशा शब्दात आसाराम बापूंनी धमकी दिलीय. जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूंना समन्स बजावलाय. त्यासाठी पोलीस इंदोरला त्यांच्या आश्रमात पोहोचलेत. ३० ऑगस्टपर्यंत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एका १६ वर्षीय मुलीवर जोधपूर आश्रमात लैंगिक अत्याचार केल्याचा आसाराम बापूंवर आरोप आहे. नवी दिल्लीत या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. मात्र ही मुलगी आपल्या नातीसारखी असल्याचं आसाराम बापूंनी म्हटलंय.




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 27, 2013, 10:50


comments powered by Disqus