‘गजकेसरी’... मोदींच्या कुंडलीत राजयोग!, Will Narendra Modi`s star signs get him success in 2014 elections?

‘गजकेसरी’... मोदींच्या कुंडलीत राजयोग!

‘गजकेसरी’... मोदींच्या कुंडलीत राजयोग!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस... देशभरातील पक्षाचे कार्यकर्ते त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सोबत काही ज्योतिषीही मोदींना शुभेच्छा देत आहेत... जन्मदिवसाच्याही आणि पंतप्रधानपदाच्याही...

होय, नरेंद्र मोदींच्या कुंडलीत राजयोग लिहिलाय, असं या ज्योतिषशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हा राजयोग त्यांच्या मार्गातील अडथळे तर दूर करेलच पण त्यांना पंतप्रधानपदावर विराजमान करण्यासही मदत करेल. काही ग्रह थोडे फार अडथळा निर्माण करतील पण इतर ग्रह मात्र त्यांच्यावर मात करून मोदींना यश मिळवून देतील.

नरेंद्र मोदी आपल्या पुढच्या खास करून पंतप्रधानपदाच्या वाटचालीसाठी सज्ज झालेत तर दुसरीकडे ज्योतिषी त्यांच्या कुंडलीचा अभ्यास करण्यात तल्लीन झालेत. त्यांच्या म्हणण्यानुसार मोदींच्या कुंडलीत वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशी आहे तसंच सूर्याची महादशा संपल्यानंतर त्यांचं भाग्य लवकरच फळफळणार आहे.

काही ज्योतिषांच्या मते मोदींची कुंडली सांगते की, पंचम स्थान आणि भाग्य स्थान कुंडलीत खूप महत्त्वाचं ठरतं. स्वामी चंद्राच्या केंद्र स्थानी आहे आणि ज्यावेळी निवडणुका होणार आङेत त्यावेळी नरेंद्र मोदींच्या भाग्य स्थानी बृहस्पति असेल... जो निश्चितच फायदेशीर ठरेल. ज्योतिषांनी मोदींच्या कुंडलीचं ‘गजकेसरी’ असं नामकरणही केलंय. सोबतच त्यांनी मोदींना आपल्या शत्रुंपासून सावध राहण्याचाही सल्ला दिलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, September 17, 2013, 12:38


comments powered by Disqus