Last Updated: Tuesday, March 25, 2014, 23:43
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईतुमच्याकडे एटीएम नसलं, तरी एटीएममधून पैसे काढणे आता शक्य होणार आहे. बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना ही सुविधा दिली आहे.
ज्या द्वारे ग्राहकांना देशातील कोणत्याही भागात पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे.
ही सुविधा देणारी बँक ऑफ इंडिया ही पहिली बँक ठरली आहे. बँकेचे चेअरमन वी आर अय्यर यांनी ही इन्स्टंट मनी ट्रान्सफर सेवाला सुरूवात केली.
या सेवेमुळे एटीएम शिवाय पैसे काढणे सोपे झाले आहे. बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना ही सुविधा दिली आहे.
जर तुम्ही मुंबईत असाल आणि देशातल्या कोणत्याही भागात तुम्हाला तुमच्या मित्राला पैसे पाठवायचे असतील, तर तुमच्या मित्राच्या मोबाईल फोनवर तुम्हाला एक कोड पाठवावा लागेल.
या कोडच्या माध्यमातून तुमच्या मित्राला एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. सुरक्षेसाठी दोन्ही बँकेच्या ट्रान्झॅक्शन स्टेटसला एक एसएमएस पाठवावा लागेल.
या सेवेच्या माध्यमातून एका वेळेस 10 हजार रूपये ट्रान्सफर करता येणार आहेत. एका महिन्यात 25 हजार रूपयेही काढता येणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 25, 2014, 23:37