पती आणि नातेवाईकांनी केला चालत्या कारमध्ये रेप!, woman gang raped by second husband and relatives

पती आणि नातेवाईकांनी केला चालत्या कारमध्ये रेप!

पती आणि नातेवाईकांनी केला चालत्या कारमध्ये रेप!

www.24taas.com, झी मीडिया, गाजियाबाद
दिल्लीच्या जवळ असलेल्या गाजियाबादच्या साहिबाबाद ठाण्याच्या हद्दीत एका महिलेवर गुरूवारी चालत्या कारमध्ये गँगरेपचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा गँगरेप बाहेरच्यांनी नाही तर पती, दीर आणि नणंदेच्या पतीने केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून रिपोर्ट अजून पोलिसांच्या हाती आले नाहीत. तसेच फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

संजयनगरची संगीताने (नाव बदलले आहे) पोलिसांकडे दाखल केल्या तक्रारी म्हटले की, १८ एप्रिलला मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी तिचा पती संदीपने तिच्याकडून २५ हजार रुपये घेतले. हे पैसे पीडित महिलेने आपल्या वडिलांकडून मागितले होते. पैसे घेऊन संदीप गायब झाला. गुरूवारी सकाळी संदीपने संगीताला फोन करून मोहननगर येथील चौकात पैसे घेण्यासाठी बोलावले. संगीता १० वाजता पैसे घेण्यासाठी गेली असता, एका कारमध्ये संदीप त्याचा भाऊ वीरेंद्र, नणंदेचा नवरा नरेंद्र आणि एक अपंग व्यक्ती बसले होते. नरेंद्रने कार भोपुराकडे पळवली. भोपुराकडे जाताना सुरूवातील संदीप, वीरेंद्र आणि नरेंद्र यांनी रेप केल्याचे पीडित महिलेने सांगितले.

आरोपी संगीताला बेशुद्ध अवस्थेत करहेडा येथील हिंडन नदीजवळ फेकून पसार झाले. शुद्धीवर आल्यावर संगीता पोलिस स्टेशनमध्ये गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगीताचे हे दुसरे लग्न आहे. गेल्या वर्षीच संदीपने तिच्याशी लग्न केले.

First Published: Friday, April 26, 2013, 15:38


comments powered by Disqus