बलात्कारानंतर महिलेची धिंड काढली

बलात्कारानंतर महिलेची काढली धिंड

बलात्कारानंतर महिलेची काढली धिंड
www.24taas.com,झी मीडिया, सांची

मध्य प्रदेशातील सांचीमध्ये एका बावीस वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला, एवढंच नाही तर नग्नावस्थेत या महिलेची गावामधून धिंड काढण्यात आली.

सांचीजवळ दोन दिवसांपूर्वी मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. विशेष म्हणजे गावकऱ्यांनीही ही घटना दाबण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झालं.

घरात प्रवेश करून एका नराधामाने पीडित महिलेवर बलात्कार केला. बलात्कारानंतर तिची नग्नावस्थेमध्येच गावातून धिंड काढली. दोन दिवसानंतर पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 20, 2014, 20:06


comments powered by Disqus