Last Updated: Friday, July 19, 2013, 21:41
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीराजधानी दिल्लीतील विवेक विहारमध्ये एका विवाहित महिलेवर तीन व्यक्तींनी मारुती व्हॅनमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. बलात्कारानंतर तिला दिलशाद गार्डन येथे फेकून देण्यात आले. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना त्या महिलेच्या २ वर्षीय मुलासमोर त्या नराधमांनी केली.
पीडित महिला आपल्या पतीसह नंदनगरी भागात भाड्याच्या घरात राहते. त्या ठिकाणी घरमालक सोनू सह त्यांचे खटके उडाले. महिलाने केलेल्या आरोपानुसार सोनू यांना भाडे मागण्याच्या नावावर नेहमी त्रास देत होता. सोनूच्या बहिणीशीही पीडित महिलेचे एक-दोनदा भांडण झालं होतं. घटना घडली त्यावेळी सोनूसह तीन आरोपी आणि सोनूची बहिणदेखील कारमध्ये उपस्थित होती.
पीडित महिलेने आपली तक्रार पोलिसांकडे दिली त्यावेळी एफआयआर दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला. पण स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीन महिलेने तीन दिवसांनंतर तक्रार दाखल केली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, July 19, 2013, 21:41