Last Updated: Wednesday, May 14, 2014, 18:15
ww.24taas.com, झी मीडिया, बंगळुरूभाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची घोषणा झाल्यापासून त्यांच्यावर सातत्यानं टीका होत आहे. आता ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलंय. त्यांनी देश सोडण्याची धमकी दिलेय.
मोदी पंतप्रधान झाल्यास देशातल्या लोकांना हुकुमशाही झेलावी लागेल. त्यामुळे मोदी पंतप्रधान झाल्यास आपण देश सोडून जावू असं अनंतमूर्तींनी म्हटलंय. मोदी पंतप्रधान झाल्यास ते लोकांच्या मनात भय निर्माण करतील. त्यामुळे असा भीतीदायक व्यक्ती पंतप्रधानपदाच्या खूर्चीत बसणं योग्य नाही असं अनंतमूर्तींनी म्हटले आहे.
डॉ. यू. आर. अनंतमूर्ती हे बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. देशाला एका अशा व्यक्तीची गरज आहे जो देशात भयमुक्त वातावरण आणि योग्य सरकार निर्माण करेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, September 21, 2013, 09:02