Last Updated: Monday, June 23, 2014, 16:43
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली शिर्डीचे साईबाबा हे काही देव नाहीत. त्यामुळं त्यांचं देऊळ बांधणं चुकीचं आहे. त्यांच्या नावावर बक्कळ पैसा कमावला जातोय, अशी वादग्रस्त टिप्पणी केलीय द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी... असं वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलंय.
साईबाबांच्या मोठ्या देवळांमधील दानपेट्यांमध्ये लाखो रुपये पडतात, शिर्डी संस्थानचं उत्पन्न तर कोटींच्या घरात आहे. या `उद्योगा`वर त्यांनी ताशेरे ओढले आहेत. साईबाबा हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक होते, हा केवळ भ्रम आहे. साईंच्या दर्शनासाठी मुस्लिम येत नाही, त्यांची पूजा करत नाहीत. त्यामुळं साईबाबांना हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक म्हणणंच चूकीचं असल्याचा त्यांचा आरोप आहे.
काही दिवसांपूर्वीच भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर शंकराचार्यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी पत्रकाराच्या श्रीमुखात भडकवल्यानं स्वामी स्वरुपानंद वादात अडकले होते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 23, 2014, 16:42