चुकीची माहिती असेल तर रेल्वे आरक्षण रद्द, Wrong Information : Railway Reservations canceled

चुकीची माहिती असेल तर रेल्वे आरक्षण रद्द

चुकीची माहिती असेल तर रेल्वे आरक्षण रद्द
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली

आरक्षण केले आहे. मात्र, जर चुकीची माहीती मिळाली तर तुम्हाला दंड तसेच तिकीट रद्द करून विनाप्रवासी घोषीत करण्यात येईल. त्यामुळे सावधान, आरक्षण करताना अचूक आणि खात्री करून माहिती भरा.

तुम्ही रेल्वेने प्रवास करीत आहात. जर तुम्ही चुकीची माहिती दिलीत किंवा रेल्वे आरक्षण करताना भरण्यात येणार्याच अर्जात चुकीची माहिती लिहीत तर तुम्हाकडून आर्थिक दंड वसूल केला जाईल. तसेच आरक्षण रद्द केले जाण्याची शक्यता आहे. चुकीची माहिती दिल्याप्रकरणी रेल्वे आरक्षण रद्द करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे.

ऐन सणासुदीच्या दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. रेल्वेचे आरक्षण करताना केंद्रातील खिडकीवर असणार्याे कर्मचाऱ्याला एक अर्ज भरून द्यावा लागतो. यानंतर अर्जातील माहिती पडताळून बघण्यासाठी स्वतंत्र कर्मचार्यांाची नियुक्ती करण्यात येणार आहे. चुकीची माहिती सादर करणार्यां कडून प्रवासाची पूर्ण रक्कम आणि दंडही वसूल करण्यात येणार आहे.

आरक्षण अर्जासोबत देण्यात आलेल्या माहितीची पडताळणी करताना त्यामध्ये दिलेला मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांकावर फोन करून कर्मचारी पत्त्याची खातरजमा करतील. पत्ता चुकीचा आढळल्यास तिकीट रद्द करण्यात येईल. तसेच प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विनातिकीट म्हणून समजले जाईल आणि त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल, असे रेल्वे प्रशासानाने म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 27, 2013, 12:55


comments powered by Disqus