मोदींनाच पंतप्रधानपदाची उमेदवारी द्या- यशवंत सिन्हा Yashwant Sinha supports Modi

मोदींनाच पंतप्रधानपदाची उमेदवारी द्या- यशवंत सिन्हा

मोदींनाच पंतप्रधानपदाची उमेदवारी द्या- यशवंत सिन्हा
www.24taas.com, नवी दिल्ली

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवारीवरून एनडीएत पुन्हा वादंग सुरू झाले आहे. नरेंद्र मोदींना भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करा अशी मागणी भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी केली आहे.

जेडीयूनं नरेंद्र मोदींना विरोध करणं योग्य नसून ते आपला निर्णय घेण्यास मोकळे असल्याचंही थेट वक्तव्य सिन्हा यांनी केलंय. तर हे यशवंत सिन्हा यांचं हे वैयक्तीक मत असून भाजपची भूमिका नसल्यानं जेडीयू य़ाला महत्व देत नसल्याचं जेडीयूचे प्रवक्ते शिवानंद तिवारी यांनी स्पष्ट केलंय.
मोदी यांनी दिल्लीत जाऊन कालच राजनाथ सिंह यांची घेतली होती. त्यानंतर आज त्यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत यशवंत सिन्हा यांनी मागणी केल्यानं नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

First Published: Monday, January 28, 2013, 18:10


comments powered by Disqus